पंतप्रधान मोदींचा शिष्यवृत्तीसंदर्भात ‘हा’ मोठा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदासाठी शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. या बैठकात अनेक निर्णय घेण्यात आले असून यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद जवानांच्या मुलांचा शिष्यवृत्ती योजनेत समावेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा शहीद जवानांच्या मुलांसाठी सर्वात महत्वपूर्ण निर्णय असल्याचे म्हटलं जात आहे.

मोदींच्या मंत्रिमंडळाचा सर्वात मोठा निर्णय –

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.

मोदींच्या मंत्रिमंडळात सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

नक्षलवादी आणि दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या राज्य पोलिसांच्या मुलांना शिष्यवृत्तीमध्ये समावेश केला आहे.

यामध्ये दर महिना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रक्कमेमध्ये वाढ करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे मुलांची शिष्यवृत्ती अडीच हजार आणि मुलींना तीन हजार रुपये वाढ केली आहे.

यासंदर्भातील माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
Exit mobile version