Wed. May 19th, 2021

 शरद पवारांची मतदानापूर्वीच मैदानातून माघार – पंतप्रधान

लोकसभा निवडणुका जवळ आल्याने राजकिय पक्ष प्रचाराला सुरूवात झाली असून सभा, मेळावे, बैठकांना जोर आला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: भाजप उमेदवारांचा प्रचार करत आहेत.आज लोकसभा निवडणुकीतील वर्धा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांची वर्ध्यात जाहीर सभा झाली.या सभेमध्येे मोंदीनी पीएसएलव्ही सी – ४५ च्या यशस्वी  प्रक्षेपणाबद्दल सर्व वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं . तसेचं शरद पवार यांच्या निवडणुकीतील माघार घेण्यावरुन त्यांनी पवारांना  लक्ष केलं आहे. शरद पवार वाऱ्याची दिशा ओळखतात यामुळे त्यांनी माघार घेतली अशी टीका त्यांनी केली आहे. या सभेत काँग्रेसने देशाला 50 वर्ष एप्रिल फूल बनवलं अशी काँग्रेसवर जोरदार टीका मुख्यमंत्र्यांनी  केली आहे.

मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल

वर्ध्यातला हा  जनसागर जनसागर बघून विरोधकांची झोप उडेल.

‘पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणारे आता निवडणूक लढवण्यासच नकार देत आहेत.

‘शरद पवार यांच्या पुतण्याच्या हातूनच त्यांची हिट विकेट गेली’

शेतकरी असूनही शरद पवारांना शेतकऱ्यांचा विसर पडला आहे.

देशाचं वारं कुठल्या दिशेने वाहतय हे शरद पवार ओळखतात.म्हणूनंच निवडणूकीतून माघार घेतली.

निवडणूक लढण्यापूर्वी पवार घराण्यामध्ये कलह झाला होता.

शरद पवारांनी मतदानापूर्वीचं मैदानातून पळ काढला.

महात्मा गांधी आणि विनोबांच्या स्वच्छतेच्या मुल्यांचा काँग्रेसकने अपमान केला आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

वर्ध्यातील सभेत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

काँग्रेसने देशाला आणि गेले 50 वर्ष एप्रिल फूल बनवलं आहे.

या सरकारकडून वर्ध्याला 498 कोटींची कर्जमाफी देण्यात आली आहे .

देश चालवण्यासाठी 56 पक्ष लागत नाहीत तर 56 इंच छाती लागते अशी खोचक टीका देखील त्यांनी केली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *