Thu. Sep 19th, 2019

मेट्रो- III च्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान मोदी उद्या पुण्यात!

0Shares

पुण्यात मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचं भूमीपूजन करण्यात येणार आहे. पंतप्रधान येणार म्हणून पुण्यातल्या बालेवाडी परिसरात जय्यत तयारी करण्यात आलीय. मेट्रो भूमिपूजनाचं निमित्त असलं, तरी भाजपा या कार्यक्रमाच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन करणार असल्याचं दिसून येत आहे.

पुण्यात 18 डिसेंबर रोजी तिसऱ्या टप्प्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचं भूमिपूजन पंतप्रधानाच्या हस्ते होणार आहे.

या मेट्रोकरता 20-20% रक्कम हे केंद्र आणि राज्य सरकार देणार आहे.

पीपीपी मॉडेलवरती ही मेट्रो होणार आहे.

टाटा सिमेंट कंपनीला विधिवत नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे प्रोसिजर पूर्ण करून काम मिळालेलं आहे.

या मेट्रोमुळे हिंजवडी उद्योग क्षेत्रातल्या लोकांना त्रास होत असला तरी आता ही मेट्रो झाल्यानंतर रोज दोन लाख लोकांना याचा फायदा होणार आहे.

या प्रकल्पाला साडेआठ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे.

हे काम तीन वर्षात पूर्ण होणार आहे

 

उद्याच्या मेट्रो भूमिपूजन कार्यक्रमाला 30-35 हजार लोक बसतील एवढी आसनव्यवस्था करण्यात आलीय. एवढी लोक येतील अशा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. लोक आणण्याची जबाबदारी आमदार खासदार,नगरसेवक यांनी घेतली आहे.

नुकत्याच लागलेल्या तीन राज्याच्या निवडणूकीच्या निकालाचा आपल्या राज्यवर परिणाम होणार नाही, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

खरंतर मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पुण्यात येण्याची चौथी वेळ आहे. पुण्यात भाजपाचे एक खासदार, आठ आमदार आणि पुणे महापालिकेतील नगरसेवक मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे मोदी यांच्या दौऱ्यात भाजप आपलं शक्ती प्रदर्शन करून 2019 निवडणुकीची तयारी सुरू करेल यात दुमत नाही.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *