Tue. Dec 7th, 2021

आज नरेंद्र मोदी करणार सिक्किमच्या पहिल्या विमानतळाचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी देशातील सिक्किमचे पहिले विमानतळ समर्पित करणार आहेत.

पंतप्रधान रविवारी गंगटोक येथे दाखल झाले असून या विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे, यानंतर नरेंद्र मोदी येथील नागरिकांची भेट घेणार आहेत.

सिक्किममधील या विमानतळाचा फायदा व्यापारक्षेत्रासाठी होणार आहे. तसेच पर्यटन क्षेत्रासाठीही हे विमानतळ फोयदेशीर ठरणार आहे.

सिक्कीमचा समावेश त्या राज्यांमध्ये होतो जेथे जास्त प्रमाणात पर्यटक दाखल होतात. अशातचं आता सिक्किमची ही विमानसेवा अंत्यत लाभदायक ठरू शकेल.

ही विमानसेवा केवळ पर्यटन आणि व्यापारचं नव्हे तर इतर गोष्टींसाठीही लाभदायक ठरणार आहे.

पाकयोंग विमानतळाचे नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन

  • 2009 मध्ये या विमानतळाची मागणी झाल्यानंतर सुमारे 9 वर्षांनी सिक्किमचे हे स्वप्न आता पूर्ण होणार आहे, हे विमानतळ गंगटोक पासून 33 किमी अंतरावर आहे.
  • हे विमानतळ 201 एकरपेक्षा अधिक असून समुद्र किनाऱ्यावरील 4,500 फूट उंचीवर स्थित पाकयोंग गावापेक्षा 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या टेकडीच्या वरच्या भागावर तयार करण्यात आले आहे.
  • हे विमानतळ भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) ने तयार केले आहे.
  • पाकयोंग विमानतळ सुमारे 605 कोटींच्या किंमतीवर बांधले गेले आहे, आणि ते भारत-चीन सीमेपासून 60 किलोमीटर अंतरावर आहे.
  •  पुढील दिवसात, मुख्य रनवेच्या बाजूला 75 मीटर दुसऱ्या पट्टीच्या बांधकामानंतर भारतीय वायुसेना या विमानतळावर विविध विमान उडवण्यास सक्षम होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *