Thu. Aug 5th, 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठीत ट्वीट करत आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाही सलग दुसऱ्या वर्षी आषाढी एकादशी कोरोनाच्या सावटात पार पडत आहे. राज्य सरकारकडून यंदा मानाच्या दहा पालख्यांनाच आषाढी वारीसाठी परवानगी देण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा पार पडली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मराठीत ट्वीट करुन आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

‘आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी माझ्या सर्वांना शुभेच्छा. सर्वांना उदंड आनंद आणि चांगले आरोग्य लाभू दे अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करूया.
वारकरी चळवळ ही आपल्या उत्कृष्ट परंपरेचं उदाहरण असून समानता आणि एकता यावर भर देणारी आहे’, असं ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे.

दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणारा आषाढी एकादशीचा सोहळा गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. आषाढीच्या निमित्ताने विठ्ठल-रखुमाईची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *