पंतप्रधानांचं जनतेला आणखी एक आवाहन, ‘तुमचं जर माझ्यावर प्रेम असेल तर…’

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून जनतेला आवाहन केलं आहे. जर माझ्यावर प्रेम असेल, तर कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव असेपर्यंत एका कुटुंबाची जबाबदारी घ्या, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे.
२२ मार्च रोजी जनता कर्फ्यूच्या वेळी संध्याकाळी दारात टाळ्या वाजवण्याचं, थाळीनाद किंवा घंटानाद करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी जनतेला केलं होतं. तंच ५ एप्रिलला दीप लावण्याचं आवाहनही त्यांनी केलं होतं. दोन्हीला लोकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पंतप्रधानांनी आता आवाहन केलं आहे की जर माझ्यावर प्रेम असेल, तर एका कुटुंबाची काळजी घ्या असं म्हटलंय
सध्याएका जागी ५ मिनिटं उभं राहून मोदींना सन्मानित करा, अशा अर्थाचे मेसेजेस पाहायला मिळत आहेत. यामागचा हेतू चांगला असू शकतो. पण जर कुणाचं इतकं प्रेम माझ्यावर असेल, तर कोरोनाचा प्रादुर्भाव संपेपर्यंत कोणत्याही एका गरीब कुटुंबाची काळजी घ्या, असं ट्वीट मोदींनी केलं आहे. हाच माझ्यासाठी सर्वांत मोठा सन्मान असेल, असं मोदींनी म्हटलंय.