कोरोना व्हायरसमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बांगलादेश दौरा रद्द

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनामुळे चीनमध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे संपूर्ण जगात कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी दक्षता घेतली जात आहे.
कोरोनामुळे अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. दरम्यान आता कोरोना विषाणूमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बांगलादेश दौरा रद्द करावा लागला आहे.
नरेंद्र मोदी हे 17 मार्चला ढाक्यातील शेख मुजीबुर रहमान यांच्या जंयती शताब्दी कार्यक्रमाच्या निमित्ताने बांगलादेशला जाणार होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेश सरकारने शेख मुजीबुर रहमान यांचा जयंती शताब्दी समारोह रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनामुळे मोदी यांना परदेश दौरा रद्द करण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्रुसेल्स दौरा रद्द करण्यात आला होता.
दरम्यान कोरोना विषाणुवर अजून कोणताही उपाय सापडलं नाही आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपायांचा वापर करावा, असं आवहान सरकारतर्फे जनतेला केलं जात आहे.
तसेच लोकांमध्ये कोरोनाबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी केंद्रीय आरोग्य विभागाने भन्नाट शक्कल लढवली आहे.
फोन केल्यावर कोरोना विषाणूबद्दल प्रतिबंधात्मक उपायांची माहिती दिली जात आहे.