Sun. Jun 20th, 2021

पाच वर्षांत प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदींची पत्रकार परिषद!

नवी दिल्ली येथील भाजप मुख्यालयामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष अमित शाह यांनी पत्रकार परिषद आयोजित केली. या पत्रकार परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित होते. त्यामुळे या पत्रकार परिषदेला विशेष महत्त्व होतं. पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांची गेल्या 5 वर्षांतील पहिली पत्रकार परिषद होती. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापूर्वी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली.

 

पत्रकार परिषदेत पंतप्रधान आणि अमित शाह काय म्हणाले?

मजबूत सरकारमुळे सर्व सुरळीत

2009 आणि 2014 मध्ये निवडणुकीदरम्यान IPL बाहेर हलवलं होतं.

मात्र मजबूत सरकार असेल तर देशातच सर्व काही होऊ शकतं.

या निवडणुकीत IPL देशातच झालं, रमजान सुरू आहे, परीक्षा झाल्या, सर्वकाही सुरळीत होतं.

जनतेने ठरविलेलं आहे की कोणाची सरकार येणार आहे

आम्हीही ठरवलंय की सरकार सत्तेत आल्यानंतर जाहिरनाम्यामधील आश्वासने पूर्ण करणार

देशात हे पहिल्यांदा होणार आहे की, आमचं सरकार पूर्ण बहुमताने दुसऱ्यांदा सत्तेवर येणार

2014 मध्ये 16 मे रोजी निकाल आला आणि 17 मे रोजी सट्टाबाजाराचं मोठं नुकसान झालं, त्यामुळे पहिल्याच दिवसापासून इमानदारीची सुरुवात झाली.

NDAमध्ये नवे पक्ष घेण्याची तयारी

आमचं नवं सरकार लगेच कामाला लागणार

मजबूत सरकारमुळे सर्व सुरळीत

जगाला भारतीय लोकशाहीची ताकद दाखवलीये

प्रज्ञासिंह ठाकूर यांना कारणेदाखवा नोटीस बजावली  आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *