Jaimaharashtra news

पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले जगातील सर्वोत्कृष्ट नेते!

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जगभरातील लोकप्रियता कायम असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगभरातील सर्वाधिक ‘ग्लोबल अप्रूवल लिडर’ ठरले आहेत. जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘Global Leader Approval ‘ म्हणून लोकप्रिय आहे.

अमेरिकेतील डेटा इंटेलिजेंस फर्म ‘मॉर्निंग कंसल्ट’ द्वारे केलेल्या सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘Global Leader Approval ‘ म्हणून स्विकारलं आहे. जागतिक नेत्यांच्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी या सर्वेक्षणात सर्वात पुढे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच ग्लोबल अप्रूवल रेटिंग ६६ टक्के इतके आहे. कोरोना काळातही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका, ब्रिटन, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, फ्रान्स आणि जर्मनीसह १३ देशांतील नेत्यांपेक्षा अव्वल ठरले आहेत.

या सर्वेक्षणात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोदींची लोकप्रियता जास्त असल्याचं दिसत आहे. इतर नेत्यांच्या तुलनेत मोदी यांचं काम चांगलं आहे. या रेटिंगमध्ये मोदींच्या पाठोपाठ इटलीचे पंतप्रधान मारियो ड्रॅग हे ६५ टक्के इतक्या रेटिंग्सने दुसऱ्या क्रमांकावर आहेत, तर तिसऱ्या क्रमांकावर मेक्सिकोचे राष्ट्रपती लोपेज ओब्रेडोर असून त्यांची रेटिंग ६३ टक्के इतकी आहे.

Exit mobile version