Mon. May 17th, 2021

पंतप्रधान मोदींच्या भाषणाने मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा नाशिकमध्ये समारोप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपासाठी पंतप्रदान नरेंद्र मोदी आज नाशिकमध्ये दाखल झाले. यावेळी पंचवटी येथे होणाऱ्या सभेत मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठी भाषेत केली. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख ऊर्जावान मुख्यमंत्री करत त्यांना पुन्हा एकदा निवडून द्या आसं आवाहनही केलं

काय म्हणाले मोदी?-

छत्रपती उदयनराजेंचं मोदींकडून स्वागत

उदयनराजेंनी डोक्यावर छत्र चढवून माझा सन्मान केला आहे.

फुले, शाहू, आंबेडकरांची पुण्यनगरी म्हणजे महाराष्ट्र

कोट्यवधी लोकांचा फडणवीसांना आशिर्वाद

महाराष्ट्राला दुसरी काशी संबोधलं जातं

महाराष्ट्र हे ज्ञानी लोकांचं राज्य आहे

कधीकाळी महाराष्ट्र – गुजरात एकत्र नांदत होते. गुजरात महाराष्ट्राचा धाकटा बंधू आहे. 5 वर्षात महाराष्ट्रात गुंतवणूक वाढली. जलयुक्त शिवारामुळे 17 हजार गावांमधील दुष्काळ दूर झाला. ‘मेक इन इंडिया’ला नाशिकमधून गती मिळाली. गेल्या 5 वर्षांत राज्याचा दुप्पट विकास झालाय. आता प्लास्टिकमुक्तीची गरज आहे.

केंद्रसरकारचं पहिलं शतक तुमच्यासमोर आहे. सरकारच्या पहिल्या शतकात धारही आहे आणि रफ्तारही आहे. आमच्या सरकारच्या कामांचा हिशेब मी देतच राहणार. देशातील प्रत्येक घटकाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. घरोघरी पाणी पोहचवून महिलांना दिलासा दिला. आम्ही आश्वासनं देतो आणि ती पाळतोही. आधीच्या अस्थिरतेमुळे महाराष्ट्राच्या विकासाला खीळ बसली होती. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना निवडून द्या.

भाजप सरकारचं प्राधान्य देशाच्या सुरक्षेला आहे. आघाडीच्या सरकारने सैन्याकडे दुर्लक्ष केलं आहे. तत्कालीन केंद्र सरकारने जवानांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं. काश्मीरला पृथ्वीवरचा स्वर्ग बनवणारच. जम्मू-लद्दाखच्या प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. काश्मिरात संविधान लागू करणं ही देशाची स्वप्नपूर्ती आहे. सीमेपलीकडून शांतीभंग करण्याचे अनेक प्रयत्न होत आहेत. कॉग्रेसचे चुकीचे निर्णय़ काश्मिरच्या जीवावर उठले. शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांकडून मतांसाठी काश्मीरसंदर्भात अपप्रचार केला. त्यांच्यामुळे देशाची बदनामी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी मातृभूमीवर सर्वस्व अर्पण करण्याची शिकवण दिली. सावरकरांनी राष्ट्रवादाचे संस्कार दिले. आंबेडकर, फुले दांपत्याच्या कार्यालाही वंदन.

राममंदिर प्रकरणी वेगाने सुनावणी होईल. डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर विश्वास असायला हवा. न्यायप्रणालीवर विश्वास ठेवा.

‘चला पुन्हा आणुया आपलं सरकार’ म्हणत नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *