Fri. May 7th, 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मुंबईकरांना जलप्रदुषणमुक्तीचा संकल्प करण्याचं आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये विविध विकासकामांचं भूमीपूजन तसंच उद्घाटनांसाठी दाखल झाले आहेत. वांद्रा- कुर्ला संकुलात मेट्रोच्या 3 मार्गांची पायाभरणी केली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीमध्ये करत सर्व मुंबईकरांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील मुद्दे-

मी रशियामध्ये असताना मुंबईतील परिस्थितीची माहिती घेत होतो.

शुक्रवारी परतल्या नंतर इस्त्रोच्या शास्त्रज्ञांसोबत रात्री होतो

कसे तन-मन लावून एखादे काम करावे, हे या इस्त्रोच्या शास्त्रज्ञांकडून शिकलो पाहिजे

चंद्रयानमध्ये काही समस्या आलेल्या आहेत मात्र इस्त्रोच्या शास्त्रज्ञ यश मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

मुंबईच्या स्पिरिट बद्दल मी खूप ऐकले आहे. आज इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे स्पिरिट बघितले

20,000 करोड पेक्षा जास्त योजनेचं कामाचा शुभारंभ झालं आहे.

मुंबईच्या विकासाला वेगळं वळण देणाच्या या योजना आहेत.

BKC मोठं सेंटर आहे, इथे काही मिनिटात आता BKC ला पोहोचता येईल.

पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘माझा लहान भाऊ’ असा केला; उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दिली दाद

21 व्या शतकातीन शहर बनविणे गरजेचे आहे.

100 लाख कोटीच्या योजना देशातील वेगवेगळ्या भागात सुरु होणार आहे.

मेट्रोचे जाळे आता काही वर्षात 330 किमी वाढणार आहे.

रेल्वेमधून जितके प्रवाशी प्रवास करतात, तितके प्रवाशी मेट्रोमधून प्रवास करणार आहे.

मेट्रोचे कोच भारतात बनत आहेत.

बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळी मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक समुद्राच्या पाण्यात जाते. मात्र

यावेळी प्लॅस्टिक समुद्राच्या पाण्यात जाण्यापासून टाळावे.

आपली प्लॅस्टिकबद्दलची भूमिका देशासाठी  निर्णायक ठरु शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *