Wed. Jun 29th, 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 2014 सालीदेखील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून नरेंद्र मोदी निवडून आले होते आणि पंतप्रधान बनले होते. यंदाही याच मतदारसंघातून मोदींनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) घटक पक्षाच्या उपस्थितीमध्ये त्यांनी हा उमेदवारी अर्ज भरला.

या धर्तीवर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीला भेट दिली. त्यांच्या काल पार पडलेल्या शक्तिप्रदर्शनामध्ये मोठ्या संख्येने जनसमुदाय जमला होता. आपला बालेकिल्ला बनलेल्या वाराणसी येथून मोदी पुन्हा एकदा उभे राहत आहेत. यावेळी NDA तील घटकपक्ष शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाश सिंग बादल यांच्यासह अन्य नेत्यांची उपस्थिती होती.

#KashiBoleNaMoNaMo हॅशटॅग ट्रेण्डिंग

लोकसभा निवडणुकांचे आत्तापर्यंत तीन टप्पे पार पडले आहेत.

आता चौथ्या टप्प्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमध्ये शक्तिप्रदर्शन केलं.

या शक्तिप्रदर्शनामध्ये मोठ्या संख्येने जनसमुदाय जमला होता.

त्यानंतर गंगेची आरतीही मोदींनी केली.

ट्विटरवरही #KashiBoleNaMoNaMo हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये होता.

आज त्यांची उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडली.

राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) घटक पक्षाच्या उपस्थितीमध्ये त्यांनी हा उमेदवारी अर्ज भरला.

एनडीएतील घटकपक्ष शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाश सिंग बादल तसेच अन्य नेत्यांची यावेळी उपस्थिती होती.

आपल्या शक्तिप्रदर्शनातून मोदींनी वाराणसीमध्ये चांगलीच वातावरणनिर्मिती केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.