Sun. Jun 20th, 2021

पुण्याची नवी फॅशन… ‘सल्लागार’!

पुणे शहरात फुटपाथ सुशोभीकरण करणे असो कीस्वच्छ सर्वेक्षणमोफत वायफाय ठिकाणांची निवडसाधा सिमेंट रस्ता यांसारख्या किरकोळ कामांपासून रस्तेउड्डाणपूल24X7 पाणीपुरवठा योजनानदीकाठ संवर्धन अशा प्रत्येक कामांसाठी आता सल्लागार नियुक्त करण्याची नवीन फॅशन महापालिकेत रुढ होऊ लागली आहे. 40 ते 42 कोटी रुपयांचा निधी सल्लागार फी म्हणून देण्यात आली आहे. यामुळे मात्र महापालिकेत सल्लागारांवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरू असल्याचे समोर आले आहे.

शहरामध्ये केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत करण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणासाठी केवळ तीन महिन्यांच्या कारकुनी कामासाठी तब्बल 35 लाख रुपयांचा निधी देऊन खासगी सल्लागार नियुक्त करण्यास मंजुरी देण्यात आली. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सल्लागाराचा महापालिकेत चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.

महापालिकेकडून प्रामुख्याने विशेष प्रकल्पयोजना राबविण्यात येतात. यासाठी हे प्रकल्प यशस्वीपणे नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी सल्लागारांची नियुक्ती केली जाते. मात्र असं काहीच होत नाही उलट अधिकारी यांची मोठी लॉबी आहे. त्यामुळे महापालिकेतील लोकप्रतिनिधींचे कंट्रोल नाही त्यामुळे जर प्रत्येक कामात सल्लागार नेमायचा असेल तर अधिकारी काय कामाचेअशी टीका मनसेने केली आहे.

तर शहरात एकदा नावीन्यपूर्ण प्रकल्पयोजना राबविण्यासाठी सल्लागार नियुक्त करणे आवश्यक आहे. उड्डाणपूलभुयारी मार्गसारख्या प्रकल्पांमध्ये अनेक अडचणी येतात. यामुळे येथे सल्लागार नियुक्त करावे लागतात. परंतु सल्लागार नियुक्त करणे आवश्यक आहेयाची खात्री करण्यात येईल…आणि ते काम पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे, असं महापौर मुक्ता टिळक यांचं म्हणणं आहे.

सल्लागारांची नियुक्ती करून आपल्याच अधिकारी-कर्मचाऱ्यांवर अविश्वास दाखवला जातो. शहरात विविध विकासकामे करण्यासाठी मोठे पगार देऊन महापालिकेत तज्ज्ञ अधिकायांच्या नियुक्या केल्या आहेत. परंतु आता अधिकारीकर्मचायाचा पगार आणि सल्लागारांवरही खर्च करून महापालिका प्रशासन सर्वसामान्य नागरिकांच्या कराच्या पैशांची उधळपट्टी करीत आहे…

पर्वती जलशुद्धीकरण रिसायकलिंग प्लॅन्ट उभारणे 

एकूण खर्च- 161.1 कोटी

सल्लागार फी – 1 कोटी 61 लाख

24X7 समान पाणीपुरवठा योजना

एकूण खर्च – 2818 कोटी 

सल्लागार फी – 18 कोटी 81 लाख

 

वडगाव शेरी जलशुद्धीकरण रिसायकलिंग प्लॅन्ट उभारणे 

एकूण खर्च – 100 कोटी 77 लाख

सल्लागार फी – 1 कोटी

 

खडकवासला येथे जॅकवेल बांधणे

एकूण खर्च – 348.95 कोटी

सल्लागर फी – 3 कोटी 48 लाख

 

भामा-आसखेड पाणीपुरवठा योजना 

एकूण खर्च – 254.08 कोटी

सल्लागार फी – 2 कोटी 54 लाख

 

स्वारगेट चौक ते कात्रज बीआरटी मार्ग 

एकूण खर्च – 74 कोटी 54 लाख

सल्लागार फी – 52 लाख 87 हजार

 

शिवणे खराडी नदीकाठ रस्ता 

एकूण खर्च – 36 कोटी 30 लाख

सल्लागार फी 3 लाख 84 हजार

 

कात्रज कोंढवा रस्ता 

एकूण खर्च 149 कोटी

सल्लागार फी – 85 लाख.

महापालिकेत हजारो उच्चशिक्षित आणि तज्ज्ञ अधिकारीकर्मचारी काम करतात. सध्या कोणताही प्रकल्पयोजना हाती घेतली की खासगी सल्लागारांची नियुक्ती केली जाते. या सल्लागारांना माहिती देणेअडचणीसोडवण्याचे काम अधिकायांनाच करावे लागते. असे असताना सल्लागारांवर मात्र कोट्यवधीची उधळपट्टी सुरू आहे ही पुणेकरांची फसवणूक आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *