पुण्यात पीएमपी ठेकेदारांचा संप

मुंबईतील बेस्ट कामगारांनंतर आता पुण्यातील पीएमपी ठेकेदारांनी अचानक संप पुकारला आहे. पीएमपी ठेकेदारांनी मध्यरात्रीपासून संप पुकारल्यामुळे पुण्यातील पीएमपीएमएल बससेवा ठप्प झाली आहे. पीएमपी ठेकेदारांनी अचानक संप पुकारल्यामुळे संपकारी कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाईचा इशारा पीएमपीएमएल प्रशासनाने दिला आहे.
पीएमपीएमएलच्या खाजगी ठेकेदारांनी आज सकाळपासून पुण्यात बस वाहतूक अचानक थांबवली आहे. त्यामुळे पीएमपीच्या ताफ्यातील सुमारे ७०० बसची वाहतूक बंद झाली आहे. थकबाकी मिळावी म्हणून हा संप करण्यात आल्याचं वाहतूकदारांचे म्हणणं आहे, तर हा दबावतंत्राचा भाग असल्याचे पीएमपीने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, गेल्या आठ महिन्यांची १०७ कोटी रुपयांची थकबाकी न मिळाल्यामुळे हा संप पुकारला असल्याचे संपकारी ठेकेदारांचे म्हणणे आहे. मात्र, या संपामुळे प्रवशांचे नुकसान झाले आहे. पीएमपी बससेवा बंद झाल्यामुळे पुणेकरांना प्रवासासाठी अनेक अडचणी आल्याअसून अनेक काळ त्यांना बस स्थानकावरच ताटकाळत रहावे लागले.