Jaimaharashtra news

तुकाराम मुंढेंच्या निर्णयामुळे पीएमपीएलच्या बसेस पुण्यातील रस्त्यांवरुन गायब

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

पीएमपीएलचा गाडा रूळावर नेण्यासाठी अध्यक्ष तुकाराम मुंढेंनी घेतलेल्या धडाकेबाज निर्णयामुळे पीएमपीएलच्या बसेस गायब झाल्या आहेत.

 

गुरुवारी दुपारपासून 440 कंत्राटी बसचालकांनी अचानक संप पुकारला. मुंढेंनी पीएमपीएलची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेतल्यानंतर अनेक धाडसी निर्णय घेतले.

 

यात एखाद्या स्टॉपवर गाडी न थांबल्यास चालकावर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूदही करण्यात आली.

 

जर, चालकाकडून एखादी चूक झाली किंवा त्याने सिग्नल तोडला तर त्याच्या पगारातून 100 रुपये दंड म्हणून घेतले जातात. हा निर्णय जाचक असल्याचे सांगत

पीएमपीएलच्या कंत्राटी चालकांनी संपाचं हत्यार उपसले. मात्र, त्यामुळे पुणेकरांचे हाल होत आहेत.

Exit mobile version