Wed. Dec 8th, 2021

घोटाळेबाज नीरव मोदीला ईडीचा दणका

पंजाब नॅशनल बँक गैरव्यवहार प्रकरणी घोटाळेबाज नीरव मोदीला ईडीने मोठा दणका दिला आहे.

नीरव मोदीची 4 देशांतील 637 कोटींची संपत्ती ईडीनं जप्त केली आहे. अंमलबजावणी संचलनालयाने न्यूयॉर्क, लंडन, सिंगापूर, मुंबईतील संपत्ती जप्त केली आहे.

मनी लाँडरिंग प्रतिबंध कायद्यांतर्गत ईडीनं अमेरिकेतील न्यूयॉर्कमधल्या नीरव मोदीची 216 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे, यामध्ये नीरव मोदीची मालमत्ता आणि बँक अकाऊंट्सचाही समावेश आहे.

नीरव मोदीच्या संपत्तीमध्ये कोणत्या गोष्टी जप्त करण्यात आल्या

  • न्यूयॉर्क शहरातील 216 कोटींची संपत्ती
  • हाँगकाँगमधून 22.69 कोटी रुपयांचे दागिने आणि हिरे
  • दक्षिण मुंबईतलं बहिणीच्या नावावर असलेलं 19.5 कोटी रुपयांचं घर
  • सिंगापूरमधील नीरवची बहीण आणि मेव्हण्याचं बँक खातं सील
  • लंडनमधील 56. 97 कोटी रुपयांचा फ्लॅटही जप्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *