Sun. Oct 17th, 2021

मेहुल चोक्सीचे अॅटिग्वाचे नागरिकत्व होणार रद्द

पीएनबी घोटाळ्यातील आरोपी असलेला मेहुल चोक्सीचे पुन्हा देशात परतण्याचे प्रयत्न सुरु आहे. अॅन्टिग्वाचे नागरिकत्व मेहुल चोक्सीने घेतले आहे.

पीएनबी घोटाळ्यातील आरोपी असलेला मेहुल चोक्सीचे पुन्हा देशात परतण्याचे प्रयत्न सुरु आहे. अॅन्टिग्वाचे नागरिकत्व मेहुल चोक्सीने घेतले आहे. पण अॅन्टिग्वाचे पंतप्रधान गॅस्टन ब्रॉउन यांनी भारतावर दबाव टाकल्यानंतर मेहुल चोक्सीचे नागरिकत्व रद्द करणार असल्याचे सांगितले आहे. म्हणून नागरिकत्वासाठी मेहुल चोक्सीची कोंडी होताना दिसतेय.

 का फेटाळले मेहुलचे नागरिकत्व?

आम्ही दुसऱ्या देशातून पळून आलेल्या व्यक्तीला नागरिकत्व देऊ शकत नाही.म्हणून चोक्सीचे नागरिकत्व रद्द करुन त्याला भारतात माघारी पाठवले जाईल. असे अॅन्टिग्वाचे पंतप्रधान गॅस्टन ब्रॉउन यांचे म्हणणं आहे.

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेल्या नीरव मोदीचा फरार उद्योगपती मेहुल चोक्सी हा मामा असल्याने तोही प्रमुख आरोपी आहे.आणि हे दोघेही तपास यंत्रणांना चकवा देत परदेशात राहत आहे असे ते म्हणाले.

 गेल्या वर्षी उघडकीस आलेल्या बँक घोटाळ्यात 13  हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला होता.बँकेला फसवून कर्ज न फेडताच मेहुल चॉक्सी आणि नीरव मोदी या दोघांनी देशातून पळ काढला होता.

चोक्सीने काही दिवसांपूर्वीच मी भारतातून पळालो नाही उपचारांसाठी परदेशात गेलो असल्याचे न्यायालयाला कळवले होते.

त्यानूसार कॅरेबिअन देश अँटिग्वा येथून चोक्सीला भारतात आणण्यासाठी एअर अँब्युलन्स पाठवण्यासही तयार होते, यामध्ये वैद्यकीय तज्ज्ञ मंडळी देखील असणार होती.

चोक्सीला भारतात सर्व प्रकारच्या आवश्यक वैद्यकीय सुविधा देखील पुरवण्यात येतील, असा युक्तिवाद ईडीने न्यायालयात केला होता.

अजामीनपात्र वॉरंट त्याच्याविरोधात काढण्यात आले होते. त्याच्याविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीसही काढली होती. पण, भारतात परत येण्यास मेहुल तयार नसल्यामुळेच त्याला फरार घोषित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *