Sun. Aug 18th, 2019

सोलापूरात पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक; 3 पोलीस जखमी

198Shares

सोलापूरमध्ये शनिवारी मध्यरात्री पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक झाली.

सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील उळे गावानजीक हा प्रकार घडला.

यामध्ये एक दरोडेखोर ठार झाला. तर तीन पोलीस जखमी झाले आहेत.

या घटनेत जखमी झालेल्या पोलिसांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चकमकी दरम्यान पोलिसांवर हल्ला –

  • शनिवारी रात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास गस्तीवर असलेल्या पोलिसांना उळे गावानजीक पाच ते सहा दरोडेखोर दिसले.
  • पोलिसांनी त्यांना हटकले आणि एकाला पकडून गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला.
  • दरोडेखोराच्या सहकाऱ्यांनी हातातील तलवारीने पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या हातावर आणि मांडीवर तलवारीने हल्ला केला.
  • दरोडेखोरांनी यावेळी दगडफेकही केली.
  • हल्ल्यानंतर स्वरक्षणासाठी पोलीस निरीक्षक पाटील यांनी दरोडेखोरांच्या दिशेने गोळीबार केला.
  • गोळीबारात एक दरोडेखोर जखमी झाला, त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
  • चकमकीत पाटील यांच्याशिवाय अन्य दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत.

 

198Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *