Sat. Oct 24th, 2020

तरुणीकडे पाहून भररस्त्यात हस्तमैथून करणाऱ्या विकृतांना अटक

मुंबईमधील वरळी येथे तरुणीकडे पाहून हस्तमैथून करणाऱ्या 2 विकृत तरुणांना अटक करण्यात आली आहे. दोघेही आरोपी मूळचे तामिळनाडू येथील आहेत. सिंगोटवेल कंदरस्वामी देवेंद्र आणि आनंद कालिप्पन देवेंद्र अशी या दोघांची नावं आहेत.

 

भररस्त्यात मुलीकडे पाहून हस्तमैथून!

वरळी परिसरात कामाला असणारी 26 वर्षीय तरुणी ऑफिसहून घरी चालली होती.

संध्याकाळी 5 च्या सुमारास लव्ह ग्रोव्ह पंपिंग हाऊस येथून जात असताना तिचं लक्ष 25 वर्षीय सिंगोटवेल कंदरस्वामी देवेंद्र याच्याकडे गेलं.

त्याने नजरेनेच मुलीला जवळच्या आनंद कालिप्पन देवेंद्रकडे पाहण्यास सांगितलं.

तरुणीने आनंदकडे पाहिल्यावर तिला धक्काच बसला.

कंदरस्वामीजवळच असलेला 38 वर्षीय आनंद कालिप्पन देवेंद्र तिच्याकडे पाहत हस्तमैथून करत होता.

हा प्रकार पाहून तरुणी घाबरली. तिने त्याच परिसरात राहणाऱ्या आपल्या एका मित्राला बोलावून घेतलं.

त्याने पालिका कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने दोन्ही विकृतांना पकडलं.

त्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षात फोन करून पोलिसांना बोलावलं.

वरळी पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले.

दोघाही विकृतांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही अशा प्रकारच्या काही घटना समोर आल्या होत्या. अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांच्यासमोरच BMW कारमध्ये बसून एक व्यक्ती हस्तमैथून करत असल्याची घटना घडली होती. यासंदर्भात चिन्मयी यांनी तक्रारही दाखल केली होती. मुंबई लोकलमध्येही महिलांकडे पाहून हस्तमैथून करणाऱ्या विकृताला यापूर्वी रेल्वे पोलिसांनी अटक केली होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *