तरुणांमध्ये ‘कुत्ता गोळी’चं वाढतंय व्यसन!

नाशिक जिल्ह्यात चरस, गांजा, कोकेन, अफूसारखे अमली पदार्थ नशेसाठी सर्रास वापरले जातात. मात्र मागच्या काही दिवसांपासून ‘कुत्ता गोळी’चा वापरही नशेसाठी मोठ्या प्रमाणावर होऊ लागलाय.

मालेगाव मध्ये या गोळ्या युवक नशेसाठी वापरात असल्याचा समोर आल्यानंतर आता नाशिक शहरात देखील या गोळ्यांचा वापर होत असल्याचं आढळून आलंय.

नाशिकच्या द्वारका परिसरातील बस स्टॅन्ड जवळ ‘कुत्ता गोळी’ अर्थात Nitracare – 10 या टॅब्लेट्सची विक्री करण्यासाठी 2 मुलं येणार असल्याची खबर भद्रकाली पोलिसांना मिळाली.

 

हे ही वाचा-  गुन्हेगारच नव्हे तर तरुण पिढीही ‘कुत्ता गोळी’च्या विळख्यात!

 

पोलिसांनी सापळा रचला.

तेव्हा 19 वर्षीय प्रेम पवार आणि 22 वर्षीय शाहरुख शेख या दोघांची झडती घेतली असता

त्यांच्याकडून एकूण 300 गोळ्या सापडल्या.

प्रेम आणि शाहरुख यांनी या गोळ्या मुंबईहून आणल्याचं पोलिस तपासात समोर आलं.

45 रुपयाला 10 अशी मूळ किंमत असणाऱ्या या गोळ्यांची हे दोघेही 400 रुपयाला विक्री करणार होते.

गांजाला पर्याय म्हणून या गोळीची नशा केली जाते.

ही गोळी घेतल्याने खूप झोप येते, अशी माहिती समोर आली आहे.

Exit mobile version