Tue. Oct 26th, 2021

मोबाईल चोरट्यांच्या टोळीला पोलिसांकडून अटक

नागपूर : लोहमार्ग पोलिसांनी चार मोबाईल चोरट्यांच्या टोळीला अटक करून १४ चोरीचे मोबाईल जप्त केले आहेत . धक्कादायक म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रियांशु क्षेत्री नामक फुटबॉलपटू अभिनेत्याचा समावेश असुन त्याने अमिताभ बच्चन यांनी अभिनय केलेल्या झुंड चित्रपटात काम केले असल्याचा खुलासा पोलिसांच्या समोर केला आहे. मौज- मज्जा करण्यासाठी पैसे अपुरे पडत असल्याने आरोपींनी मोबाईल चोरीचा मार्ग अवलंबला होता असा देखील खुलासा झाला आहे.

नागपूर लोहमार्ग पोलिसांनी ट्रेन मधुन मोबाईल चोरी करत असल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या चारही आरोपींकडून चोरीचे १४ मोबाईल जप्त केले आहेत. आरोपी हे मोबाईल चोरी केल्यानंतर कमी भावात विकायचे. त्यातून मिळणारे पैसे हे आरोपी मौजमजा करण्याकरिता वापरत असायचे असा खुलासा पोलिसांनी केलाय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *