महिलांवर Chemical attack करणारा विकृत अटकेत!

मुंबई येथे रेल्वे स्टेशनवर महिला प्रवाशांच्या अंगावर केमिकल टाकणाऱ्या विकृत तरुणाला अटक करण्यात आली आहे. निर्भया पथकाने आज अंधेरी स्थानकात आरोपीला रंगेहाथ पकडले आहे. या आरोपीने रेल्वे, मेट्रो, मुंबई शहराच्या हद्दीत अनेक गुन्हे केले आहेत.
भूज एक्स्प्रेसमध्ये सुरतच्या दरियाबाई चौधरी यांच्या हत्याकांडाची घटना ताजी असतानाच, रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांवर केमिकल अटॅक होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी लागोपाठ दोन गुन्हे अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.
कसा उघडकीस आला प्रकार ?
दोन दिवसांपूर्वी अंधेरी मेट्रो स्थानकातून तक्रारदार तरुणीने नोकरीला जाण्यासाठी अंधेरी रेल्वे स्थानकाचा पूल गाठला.
अचानक तिच्या पायाकडे जळजळ झाली. तिने पाहिले तेव्हा, कसले तरी केमिकल अंगावर फेकल्याचे तिच्या लक्षात आले.
या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने घर गाठले. घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगताच त्यांना धक्का बसला.
त्यांनी पाहिले तेव्हा तिचा पाय लाल झाला होता.
कुटुंबियांनी मुलीला धीर देत, तिच्यासह अंधेरी रेल्वे पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
चौकशीत यापूर्वीही अशा स्वरूपाची तक्रार आल्याची माहिती कुटुंबियांना मिळाली.
या प्रकरणी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारदार तरुणीवर सध्या उपचार सुरू आहेत.
अशा प्रकारे मुंबईतील अन्य रेल्वे स्थानकांवरही असा प्रकार घडल्याच्या तक्रारी समोर आल्या. अंधेरी Metro स्थानकातून अंधेरी स्थानकाकडे येणा-या प्रवाशांच्या गर्दीत हा प्रकार घडला. दोन्हीही घटना सकाळी 9.30 ते 10.30 च्या सुमारास घडल्या होत्या. या वेळेत college, job साठी प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनी, महिलांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते.
काय करायचा हा विकृत?
तंग कपडे पाहून, आरोपी त्यांच्या पायावर आणि कंबरेकडील भागावर केमिकल टाकायचा.
महिलांच्या पार्श्वभागावर फेविक्विक फेकायचा.
त्यानंतर काही अंतर गेल्यानंतर महिलांच्या अंगाला जळजळ होत असे आणि आपल्यावर chemical टाकल्याचं तरुणींच्या निदर्शनास यायचं
आरोपी परिचय –
आरोपीचं नाव रणवीर चौधरी, वय 24.
राहणारा उत्तर प्रदेशचा.
दोन वर्षांपूर्वी कामानिमित्त मुंबईत आला.
चांदिवलीत मित्रांसोबत तो राहायचा.
लोअर परेल येथील फर्निचरच्या दुकानात काम करत होता.
तक्रारींनंतर साध्या गणवेशातील पोलीस आरोपीचा शोध घेत होते आणि निर्भया पथक देखील आरोपीचा मागावर होते. आज अखेर आरोपीच्या रंगेहाथ मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.