Tue. Oct 26th, 2021

ATM मध्ये फसवणूक, दोघांना अटक

ATM  मशीनमध्ये PIN सेट करण्यासाठी गेलेल्या तरुणाची फसवणूक करण्यात आली आहे. 2 जणांनी त्याच्या खात्यातील तब्बल 62,786 इतकी रक्कम चोरी केली. 27 जानेवारीला मुंबईतील गोवंडीमध्ये ही घटना घडली होती.

काय आहे प्रकरण ?

22 वर्षीय अन्वर जियाउद्दीन शेख हा चालक आहे.

गोवंडी पूर्वेकडील बँक ऑफ बडोदा बँकेच्या ATM मध्ये PIN सेट करायला गेला होता.

तेथील 2 आरोपींनी PIN सेट करायला मदत करतो सांगून फसवणूक केली.

आरोपींनी मदत करायच्या बहाण्याने हात चालाखी करत स्वत:चं ATM कार्ड अन्वरला दिलं.

तसंच त्याच्या बँक खात्यातून 62,786 इतकी रक्कम घेऊन फसवणूक केली.

आपली फसवणूक झाल्याचे कळल्याबरोबर अनवरने गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली.

24 तासात पोलिसांनी या प्रकरणाचा शोध लावला.

अजयकुमार मेवालाल राजभर (23 वर्षे) आणि अब्दुल्ला जियाउद्दिन शेख (22 वर्ष) अशी आरोपींची नावं आहेत.

पोलिसांनी 30 जानेवारीला दोन्ही आरोपींना नवी मुंबईच्या उलवे सेक्टर 9 येथून अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *