Mon. Oct 25th, 2021

भय्यू महाराजांच्या आत्महत्येचं गूढ उकललं!

भय्यू महाराज यांच्या आत्महत्येसंदर्भातील रहस्याचा आता उलगडा झाला आहे. भय्यूजी महाराजांनी ब्लॅकमेलिंग आणि बदनामीच्या भीतीने आत्महत्या केल्याचं याआधीही समोर आलं होतं. आता त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या निकटवर्तीय 3 सेवकांनी मिळून त्यांना मारण्याचा कट रचला होता. सेवक विनायक दूधाळे, शरद देशमुख आणि पलक असे या आरोपींची नावे आहेत. आरोपींना अटक केली असून त्यांना 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आत्महत्येचा उलगडा

इंदूर पोलिसांनी शुक्रवारी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

सेवक विनायक दूधाळे, शरद देशमुख आणि पलक यांनी रचला होता कट

पलक आणि भैयूजी महाराज यांचा आधीपासून परिचय होता.

ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने पलक त्यांना अश्लील मॅसेजेस पाठवायची.

तिघांच्या जाचाला कंटाळून ब्लॅकमेलिंगच्या दडपणाखाली भैयूजी महाराजांनी आत्महत्या केली.

ही पलक कोण?

मनमीत अरोरा या इसमाने पलकची भेट भैयूजी महाराजांशी करुन दिली होती.

विनायक आणि देशमुखच्या माध्यमातून पलकने महाराजांशी जवळीक साधली.

त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करण्यात येत होतं.

पलकने महाराजांच्या दुसऱ्या लग्नात अडथळा निर्माण केला होता.

त्यावेळेसही विनायक आणि शरद तिच्या सोबत होते.

पलकने 16 जूनला त्यांच्या लग्नाची तारीख ठरवली होती.

आपला प्लॅन सक्सेसफुल झाल्याचा मॅसेज पलकने विनायक आणि शरदला पाठवला होता.

कधी केली होती आत्महत्या?

12 जून 2018 मध्ये इंदूर येथे अध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराजांनी स्वत:ला गोळी मारुन आत्महत्या केली होती. मानसिक दडपणाखाली आत्महत्या केल्याचा उल्लेख त्यांच्या पत्रात केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *