Thu. May 19th, 2022

किरकोळ वादातून अल्पवयीन मुलाने केला मित्राचा खून

मद्यधुंद अवस्थेत झालेल्या किरकोळ वादातून एका अल्पवयीन मुलाने मित्राच्या डोक्यात दगड घालत तसेच तलवारीने वार करत खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास ताथवडे येथे ही घटना घडली आहे. गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने दोन तासात अल्पवयीन मुलाला अटक केले आहे. जुबेर गुलाब मुजावर (वय १९, रा. सपकाळ चाळ, सोनवणे वस्ती, ताथवडे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात पोलीसांना यश आलं आहे. दारु पिण्याच्या वादातून हा खून केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

नेमकं प्रकरण काय?

जुबेर मुजावर आणि आरोपी हे मित्र असून ते नेहमी दारू पिण्यासाठी एकत्र बसत होते.

गुरुवारी रात्री ते ताथवडे बालाजी कॉलेजकडे जाणाऱ्या निर्जन रस्त्यावर बसून दारू पित होते.

याठिकाणी किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद आणि वादाचे रुपांतर मारामारीमध्ये झाले.

रागाच्या भरात मुजावर याने मित्राला मारण्यासाठी तलवार उगारली.

याचवेळी आरोपीने मुजावरच्या डोक्यात दगड घालून त्याला जखमी केले.

त्यानंतर मुजावरची तलवार घेऊन त्याच्यावरच वार करून खून केला.
शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला असता पोलीस यंत्रणा कामाला लागली.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.