Sat. May 25th, 2019

PUBG खेळणे पडले महागात, 10 जणांना अटक

79Shares

PUBG या ऑनलाइन गेममुळे तरुणांमध्ये नैराश्य आणि मानसिक ताण वाढत असल्याचे समोर येत असतानाच गुजरातमधील राजकोट शहरात PUBG गेमवर बंदी घालण्यात आली आहे.

या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी 10 जणांना अटक केली आहे.

‘प्लेयर्स अननोन बॅटलग्राऊंड’ अर्थात ‘PUBG’ हा ऑनलाइन गेम पालक आणि शिक्षकांसाठी चिंतेची बाब ठरला आहे.

राजकोट पोलिसांनी 6 मार्च रोजी पबजी गेमवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. PUBG या गेमचे तरुणानां प्रचंड वेड लावले आहे.

या पार्श्वभूमीवर तरुणांमध्ये हिंसक वृत्ती वाढत आहे. याशिवाय या गेममुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर देखील परिणाम होत आहे.

सामाजिक सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ नये यासाठी PUBGवर बंदी घालण्यात येत आहे”, असे पोलिसांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले होते.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला होता.

या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी राजकोट पोलिसांनी आत्तापर्यंत 10 जणांना अटक केली आहे.

आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी राजकोट पोलिसांनी 6 ते 13 मार्च या कालावधीत एकूण 10 जणांना अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *