Sat. Mar 28th, 2020

Youtube वर पाहून रंगीत झेरॉक्स मशीनद्वारे बनवल्या 100च्या बनावट नोटा!

जळगावात भारतीय चलनातील 100 रुपयांच्या नोटांच्या कलर झेरॉक्स तयार करून बनावट नोटा चलनात आणणार्‍या दोघांचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.

पथकाने केलल्या कारवाईत 74 हजार 300 रुपयांच्या 100 रुपये दराच्या बनावट नोटा हस्तगत केल्या.

झेरॉक्स मशीन आणि नोटा बनावटीकरण करण्याचे साहित्यदेखील आढळून आलं.

अमजदखान अफजलखान वय 22 मोहम्मदीया नगर , रा.तांबापुरा व शेख रईस शेख रशीद वय 25 रा. मच्छीबाजार तांबापुरा या दोघांना ताब्यात घेतलंय.

याप्रकरणी एमआयडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संशयितांनी गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा चलनात आणल्या असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

कलर झेरॉक्स मशिनवर बनावट नोटांचा कारखाना

शहरातील तांबापुरा परिसरात सुरू होता पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा घातला.

शेरा चौकात शेख रईस शेख रशीद आणि अमजदखान अफजलखान या दोन्ही तरुणांकडे बनावट नोटा असलेली बॅग मिळाली.

त्यातील नोटा ते चलनात आणणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बापू रोहम यांना मिळाली.

आरोपींच्या बॅगेमध्ये एकूण 74 हजार 300 रुपयांच्या 100 रुपये दराच्या बनावट नोटा सापडल्या.

याप्रकरणी दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून झेरॉक्स मशीन तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *