Mon. Aug 19th, 2019

गुंडाचा वाढदिवस पोलीस स्थानकात साजरा; पोलीस निलंबित

0Shares

मुंबईतील भांडुप येथील पोलीस स्थानकात गुंडाचा वाढदिवस साजरा केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे भांडुप पोलीस स्थानकाचे दोन पोलीस उपनिरीक्षक आणि दोन पोलीस हवालदार वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. मात्र पोलीस स्थानकात वाढदिवस साजरा करणे पोलिसांना चांगलच महागात पडले आहे. पोलिसांवर कडक कारवाई करत त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

नेमकं काय घडलं ?

मुंबईतील भांडुपच्या पोलीस स्थानकात एका गुंडाचा वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

भांडुप पोलीस स्थानकाच्या एका अधिकाऱ्याच्या कॅबिनमध्ये केक कापून वाढदिवस साजरा करताना दिसत आहे.

भांडुप पोलीस स्थानकाचे दोन पोलीस उपनिरीक्षक आणि दोन पोलीस हवालदार वाढदिवस साजरा करताना दिसत आहे.

त्यामुळे पोलिसांवर कडक कारवाई करत त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

गुंडांचे वाढदिवस पोलीस स्थानकात होत असल्यामुळे सामन्य जनतेने न्यायासाठी कोणाकडे जावे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

 

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *