Thu. Sep 29th, 2022

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना अटक

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने पांडेंना अटक केली आहे. एनएसई नॅशनल स्टॉक एक्स्चेंज मधील कर्मचाऱ्यांच्या कथित फोन टॅपिंग प्रकरणाशी निगडीत मनी लॉड्रिंग प्रकरणात पांडेंवर कारवाई करण्यात आली आहे. २००९ ते २०१७ या काळात पांडेंनी बेकायदेशीर पद्धतीने फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे. ५ जुलै रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी ईडीने संजय पांडेंना सर्वप्रथम बोलावलं होतं, त्यानंतर मंगळवारी दिवसभर चाललेल्या चौकशी शेवटी ईडीने संजय पांडे यांना अटक केली आहे.

संजय पांडे यांनी 2001 मध्ये पोलीस खात्यातील सेवेचा राजीनामा दिला आणि आयसेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपनी सुरू केली. मात्र, त्यावेळी तांत्रिक कारणामुळे त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नाही. त्यांना पुन्हा सेवेत हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यांनी 2006 मध्ये कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पांडेंनी त्यांच्या आई व मुलाला आपल्या कंपनीत संचालकपद दिले.

एनएसई गैरव्यवहार प्रकरणात २०१८ मध्ये नोंदवलेल्या गुन्ह्यांच्या आधारे ईडी तपास करत आहे. संजय पांडे यांनी पांडे यांनी समाविष्ट केलेली फर्म 2010 ते 2015 या कालावधीत एनएसईमध्ये सिक्युरिटी ऑडिट करण्याचे काम सोपवलेल्या आयटी कंपन्यांपैकी एक होती, यालाच को-लोकेशन घोटाळा झाल्याचे मानले जाते. या कंपनीला त्यापोटी सुमारे चार कोटी 45 लाख रुपये देण्यात आले. कंपनीने बेकायदेशीपणे फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे. त्यासाठी कोणतीही अधिकृत परवनागी घेतली नाही, कर्मचाऱ्यांना विश्वासात घेतले नाही, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. फोन टॅपिंगमधील संवाद रामकृष्ण किंवा इतर अधिकाऱ्यांना पुरवले जात असल्याचा संशय सीबीआयला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.