Tue. Aug 9th, 2022

‘राज ठाकरेंच्या सभेबाबत पोलीस आयुक्त निर्णय घेणार’ – गृहमंत्री

महाराष्ट्र दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादेत सभा पार पडणार आहे. मात्र, अद्याप राज ठाकरे यांच्या सभेला पोलिसांची परवानगी मिळाली नाही, याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तसेच भाजप नेते किरीट सोमैया यांच्या गाडीवर झालेला हल्ला आणि राणा दाम्पत्यावरील कारवाई यावरही वळसे-पाटील यांनी भाष्य केले आहे.

औरंगाबादेत राज ठाकरे यांच्या सभेबाबत पोलीस आयुक्त येत्या दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले आहेत. तसेच राज्यात अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यस्था बिघडवण्याचे प्रयत्न हाणून पाडू, असा इशारा गृहमंत्र्यांनी दिला आहे. तसेच पोलिसांची बदनामी करू नका, असेही ते म्हणाले.

खासदार नवनीत राणा यांना कोठडीत हीन वागणूक दिली असल्याचा आरोपाप्रकरणी गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. नवनीत राणआंचा कोठडीत छळ झाला असून त्यांना कोणतीही हीन वागणूक देण्यात आली नाही. नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना तक्रार करत पत्र लिहिले आहे. याबाबत लोकसभा अध्यक्षांनी आमच्याकडे माहिती मागितली आहे. त्यामुळे नवनीत राणासंदर्भात लोकसभेच्या सचिवांना अहवाल पाठवला जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळस-पाटील म्हणाले.

दरम्यान, गृहमंत्र्यांनी किरीट सोमैया यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भाष्य केले. सौमैयांच्या तक्रारीचा तपास खार पोलीस करणार असल्याची माहिती दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.