Sat. Aug 13th, 2022

नाशिकमध्ये एसटी प्रवासासाठी पोलीस तैनात

राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचे वेतनववाढ करण्याचा निर्णय घेतला असून संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र एसटी कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात एसटी बसच्या  सुरक्षेसाठी पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्यातील एसटी बसच्या सुरक्षेसाठी तब्बल ६५० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. एसटी बसवर होणाऱ्या दगडफेकीच्या घटना टाळण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. तसेच कायदा हातात घेणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करणार असल्याचे संकेत नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिले आहेत.

विलिनीकरणाची मागणी मान्य होईपर्यंत कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र तरीही वेतनवाढीची मागणी मान्य न करता आजही एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहेत. तसेच राज्यातील काही कर्मचारी आजपासून पुन्हा कामावर रूजू झाले आहेत. त्यामुळे सुरू झालेल्या एसटी बसच्या सुरक्षेसाठी नाशिकमध्ये पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. तब्बल ६५० पोलीस नाशिक जिल्ह्यात तैनात करण्यात  आले आहेत. तसेच कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.