डोंबिवलीतील जर्जर इमारतींचा मुद्दा ऐरणीवर, बळजबरीने केली जातायत घरं खाली?

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत ग प्रभागात धोकादायक आणि अतिधोकादायक इमारती पाडण्याचे सत्र आज दुसऱ्या दिवशी ही डोंबिवलीत पाहायला मिळाले. आज सकाळी संगीतावाडीतील धोकादायक 45 वर्षांपूर्वीची ‘साई सदन’ इमारत महापालिकेने तोडायला घेतली. यातील काही रहिवाशांनी आधीच काही घरे खाली केली आहेत. तर काहींना आज महापालिकेने घरं खाली करायला लावली. जर्जर झालेल्या इमारतीचा मुद्दा ऐरणीवर आलाय. त्यामुळे महापालिका पोलीस बळाचा वापर करून घरं खाली करतेय.

मालकाने आणि महानगर पालिकेने आम्हाला पर्यायी व्यवस्था करून द्या या मुद्द्यावर नागरिक आणि मालकांत पोलिसासमोरच वाद झाले.

नवीन अटी व शर्तीवर आपण नवीन घरे लोकांना बांधून देऊ. पण त्याचा बांधकाम खर्च काही प्रमाणात रहिवाशांना द्यावा लागेल, अस मालकाचं म्हणणं आहे.

तर अनेक रहिवासी गरीब आहेत. त्यांनी पैसे आणायचे. कुठून हा मुद्दा समोर येतोय तर मालकाकडून लेखी हमी हवीय. या बाबत लोकांनी इमारत तोडण्यास सुरुवातीस नकार दिला.

मात्र मालक आणि भाडेकरू यांनी समन्वय ठेवून शांततेत हा प्रश्न एकत्र बसून सोडवावा, असं प्रभाग अधिकाऱ्याचं म्हणणं आहे.

महानगरपालिकेने धोकादायक इमारती पाडण्याचा सपाटा सुरू ठेवलाय मात्र पुनर्विकासासाठी जागा मालक आणि महानगरपालिकेने योग्य न्याय द्यावा, अशी भूमिका समाजवादी फॉरवर्ड ब्लॉक चे अध्यक्ष सतीश शिर्के यांनी केलीय.

Exit mobile version