Fri. Aug 6th, 2021

पुण्यात मूकबधीर विद्यार्थ्यांच्या मोर्चावर पोलीसांचा लाठीचार्ज

पुणे येथील समाजकल्याण आयुक्तालयावर विविध मागण्यांसाठी मूकबधीर विद्यार्थी मोर्चा घेऊन आले होते.

या मोर्चादरम्यान मूकबधिरांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. मूकबधिरांना शिक्षण, रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून द्यावा अशी त्यांची मागणी आहे.

महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता.

तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा या विद्यार्थ्यांनी दिला आहे.

पोलिसांचा लाठीचार्ज

मूकबधिरांच्या मोर्चादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे.

आम्ही शांततेत मोर्चा काढत होतो तरीही पोलिसांनी आमच्यावर लाठीचार्ज केल्याचे आंदोलकांनी सांगितलं आहे.

मूकबधीर विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केल्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.

पोलिसांनी काही आंदोलक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं आहे.

लाठीचार्जमध्ये काही मूकबधीर विद्यार्थी जखमी झाल्याचे सांगण्यात येतं आहे.

आम्ही विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु एकमेकांच बोलण कळत नसल्याने परिस्थीती हाताबाहेर गेल्याचं पोलीसांनी म्हंटल आहे.

विद्यार्थी बेफाम झाल्याने  त्यांना आवरण्याचा प्रयत्न केल्याचंही पोलीस अधिकाऱ्यांनी  सांगितले आहे.

सरकारने त्वरीत पावले उचलली नाहीत तर मुंबईला चालत जाऊन मोर्चा काढण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *