Tue. Jun 2nd, 2020

जबाब नोंदवायला आलेल्या अल्पवयीन मुलीचा पोलिसाकडून विनयभंग

पोलीस स्थानकात अल्पवयीन मुलीचा पोलीस कर्मचाऱ्यांनेच विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना कोल्हापूरातील राजारामपुरी पोलीस स्थानकात घडली आहे. जबाब देण्यासाठी पोलीस स्थानकात आलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं ?

राजारामपुरी पोलीस स्थानकात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला.
जबाब देण्यासाठी ही अल्पवयीन मुलगी पोलीस स्थानकात आली होती.
जबाब देत असताना जबाब घेणारा पोलीस कर्मचारी चेतन घाडगे यांनी मुलीच्या पाठीवरून हात फिरवला आणि आक्षेपार्ह भाषेत बोलल्याचे समोर आले आहे.
या मुलीने त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
तसेच ऑन ड्यूटीवर असतानाच पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा या प्रकरणाचा तपास करत आहेत.
चेतन घाडगे यांच्याविरोधात कलम 354 आणि पॉक्सो अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
यापूर्वी सायनच्या टिळक रुग्णालयातही रुग्णाच्या महिला नातेवाईकावर बलात्कार करण्यात आला होता.
सध्या विनयभंग आणि बलात्काराच्या प्रकरणात वाढ झाल्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *