Wed. Jun 16th, 2021

लाच म्हणून पोलिसांनी केली शरीरसुखासाठी 3 तरुणींची मागणी!

नेहमी गुंडांच्या कारनाम्याने हैराण असलेलं नागपूर पोलीस दल आज आपल्याच दोन कर्मचाऱ्यांच्या कारनाम्याचे चिंतेत पडलंय. MPDA अंतर्गत कारवाई न करण्याच्या मोबदल्यात ‘कामवासनेसाठी तीन तरुणी पुरवा आणि 25 हजार रुपये द्या,’ अशी लाच मागितल्याप्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाच्या साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक व पोलिस हेडकॉन्स्टेबलला मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. या घटनेनंतर भ्रष्टाचाराचं बदलतं  स्वरूप पुढे आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर सामाजिक सुरक्षा विभागाच्या संपूर्ण पथकाची तडकाफडकी बदली केली.

पीडित महिलांची पोलीस प्रकरण विशेष पद्धतीने हाताळून त्यांना न्याय देण्याच्या उद्देशाने नागपूर पोलिसांनी ‘भरोसा सेल’ स्थापन केलं आहे. मात्र याच भरोसा सेल मध्ये गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागात एक असं प्रकरण घडलंय की या सेलवर भरोसा ठेवावा की नको, असा प्रश्न महिलांना पडेल. कारण MPDA अंतर्गत कारवाई न करण्याच्या मोबदल्यात एका तरुणीकडून चक्क ‘तीन तरुणी पुरवा आणि २५ हजार रुपये द्या,’ अशी लाच मागण्यात आली.

काय घडलं नेमकं?

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने 32 वर्षीय तक्रारदार तरुणीच्या स्पामध्ये तीन वेळा छापा टाकून देहविक्रीव्यवसाय उघडकीस आणला होता.

काही दिवसांपूर्वी सामाजिक सुरक्षा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तिच्याविरुद्ध प्रतिबंधक कारवाई केली.

मात्र MPDA अंतर्गत कारवाई न करण्यासाठी राजूरकर व मिश्रा या दोन अधिकाऱ्यांनी तिला 25 हजार रुपये मागितले.

एवढीच लाच न मागता त्यांनी तीन मुली पुरवण्याचीही मागणी केली.

पीडित तरुणीने लाचलुचपत विभागाकडे याची तक्रार केली.

प्रकरण नागपूर पोलिसांशी संबंधित असल्याने कारवाईत गुप्तता राहावी यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भंडारा युनिटच्या लाचलुचपत अधिकाऱ्यांना सापळ्यासाठी नेमलं.

मंगळवारी दुपारी तरुणी SSBच्या कार्यालयात गेली. लाचेसंदर्भात बोलणी सुरु झाली.

यावेळी दोघांनी तिला 25000 रुपये आणि तीन मुली पुरवण्याची मागणी केली. हे संभाषण रेकॉर्ड झालं.

त्या आधारावर लाच मागितल्याचं स्पष्ट होताच ACB च्या पथकाने दामोदर राजूरकर आणि शीतलप्रसाद मिश्रा या दोघांना अटक केली आहे.

या प्रकरणानंतर सामाजिक सुरक्षा विभागाच्या संपूर्ण पथकाची तडकाफडकी बदली केली.

एखाद्या प्रकरणा नंतर पोलीस विभागातील संपूर्ण पथकाची बदली करण्याची ही पहिलीच वेळ आहे

नागपूरचे पोलीस आयुक्त भूषण कुमार उपाध्याय यांनी हे बदलीचे आदेश काढले

2018 मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यात सुधारणा करण्यात आल्या. शासकीय अधिकाऱ्याने कामाच्या मोबदल्यात शरीरसुखाची मागणी केल्यास ते Undue Advantage भ्रष्ट्राचार प्रकरणात मोडतं. त्यामुळे नागपूर गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा पथकात चालणारा भ्रष्टाचार उघड झाल्याने याची पाळंमुळं कुठपर्यंत आहे याचा आता तपास होण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *