Fri. Dec 3rd, 2021

बनावट सॅनिटायझर बनवणाऱ्या फार्मला पोलिसांनी ठोकले टाळे

राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव होत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून लोक सॅनिटायझरचा वापर करत आहेत.

मात्र यातही भ्रष्टाचार होत असल्याच्या घटना वारंवार उघडकीस येत आहेत. नुकतीच नागपूरमधील बोगस सॅनिटायझर बनवणाऱ्या फार्मवर धाड टाकल्याची घटना समोर आळी आहे.

नागपूरच्या सीताबर्डी परिसरात पोलीस आणि फूड आणि ड्रग विभागाने संयुक्त कारवाई करत बोगस सॅनिटायझर बनवणाऱ्या एका फार्मला टाळा ठोकला आहे. भर बाजारात गुरुकृपा ट्रेडर्स नावाच्या फार्ममध्ये हा गोरखधंदा सुरू होता.

या ठिकाणातून एफडीए आणि पोलिसांनी शरीराला अपायकारक ठरतील असे 1 हजारपेक्षा जास्त सॅनिटायझर बनवण्या इतपत केमिकल्स आणि कच्चा माल जप्त केला आहे.

एफडीए आणि पोलिसांना बुधवारी संध्याकाळी मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले. सीताबर्डीमधील पकोडा गल्ली स्थित गुरुकृपा ट्रेडर्स नावाच्या दुकानात नकली सॅनिटायझर बनवले जात आहे. अशी माहिती त्यांना मिळाली होती.

त्यानुसार संध्याकाळी जेव्हा या दुकानात धाड टाकण्यात आली, तेव्हा त्या ठिकाणी फ्लोर क्लिनिंगसाठीचे केमिकल मोठ्या प्रमाणावर आढळले. त्यामुळे पोलिसांची शंका वाढली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून संबंधित व्यापाऱ्याने हे सॅनिटायझर बनवणे सुरू केले होते.

त्यासाठी चक्क फ्लोर क्लिनिंगचे केमिकल वापरले जात होते. एफडीएने संपूर्ण साहित्य जप्त केले असून पुढील तपासणीसाठी सर्व केमिकल प्रयोगशाळेत पाठवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *