Mon. Jan 24th, 2022

मोदींच्या सोशल मीडिया सोडण्याच्या ट्विटवरुन नेत्यांच्या प्रतिक्रिया

मोदींच्या सोशल मीडिया सोडण्याच्या ट्विटवरुन राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. अनेक राजकीय पक्षांकडून तसेच नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत.

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवाब मलिक यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

मोदींनी सोमवारी सोशल मीडिया रविवारपासून सोडण्याचे संकेत दिले आहेत. इतर काही नेत्यांनी देखील सोशल मीडिया सोडण्याबद्दल म्हटलं आहे. जर सर्व भक्तांनी सोशल मीडिया सोडला तर देश शांत होईल.

मोदींचा हा निर्णय देश हितात असेल तर आम्ही या निर्णयाचं स्वागत करु. मोदीजी याबद्दल निर्णय घ्या, असं आवाहन नवाब मलिक यांनी मोदींना केलं आहे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडिया सोडणार ?

आव्हाड यांनी मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयावरही टीका केली. मोदींनी सोशल मीडिया बंद करायला ८ दिवसांचा वेळ घेतलाय. परंतु नोटबंदी मात्र क्षणात केली होती, असं आव्हाड म्हणाले.

म्हणजेच विचार न करता घेतलेल निर्णय घातक असल्याची कल्पना आल्यामुळे मोदींनी आठ दिवसांचा वेळ घेतला असेल का, असा सवालही जितेंद्र आव्हाडांनी केला.

राहुल गांधीं यांनीही सल्ला दिला आहे.

द्वेष सोडा, सोशल मीडिया नाही, असा खोचक सल्ला दिला राहुल गांधी यांनी मोदींना दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया सोडलं तर त्यांचे लाखो फॉलोअर्स अनाथ होतील, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊतांनी दिली आहे.

दरम्यान मोदींनी सोशल मीडिया सोडल्यास मी देखील सोडेन, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे.

…तर मी देखील सोशल मीडिया सोडणार – अमृता फडणवीस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *