Wed. Aug 4th, 2021

राजकीय पक्षांचा जाहिरातबाजीवर ‘एवढा’ खर्च

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान रविवारी पार पडले असून सगळीकडे चर्चा निकालची होत आहे. यंदा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे केंद्रात कोणाची सत्ता येईल हे पाहणे महत्तवाचे ठरणार आहे. मात्र अनेक वृत्तवाहिनींनी घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आपण केलेली कामं जनतेपर्यंत पोहोवण्यासाठी, पक्ष जिंकून येण्यासाठी राजकीय पक्ष जाहीरातबाजी करताना दिसतात. मात्र राजकीय पक्षांनी फेब्रुवारीपासून मे महिन्यापर्यंत जाहीरातबाजी केलेल्या खर्चचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

राजकीय पक्षांचा जाहीरातबाजीवर खर्च –

आपल्या पक्षाने केलेली कामं जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी राजकीय पक्ष प्रचंड जाहीरातबाजीवर खर्च करतात.

फेसबुक अॅड लायबररी रिपोर्टनुसार फेब्रुवारीपासून मे पर्यंत राजकीय पक्षांनी प्रचंड खर्च केल्याचे समजते आहे.

राजकीय पक्षांनी 53 कोटी रुपयांची जाहिरातबाजी फेसबुक आणि गुगलवर केल्याचे रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

या माध्यमांवर राजकीय पक्षाचे जाहिरातबाजीवर खर्च ?

भाजप –

फेसबुक – १.२१ लाख राजकीय जाहीरातीवर 26.5 कोटी रुपये खर्च.

गुगुल सारख्या इतर माध्यम – 27.36 कोटी रुपये खर्च.

समाजमाध्यम – 4 कोटी रुपयांचा खर्च.

गुगल – 17 कोटी खर्च केला.

कॉंग्रेस –

फेसबुक – 3686 जाहीराती 1.43 कोटी रुपये खर्च.

गुगल – 425 जाहिरातींवर 2.71 कोटी खर्च.

तृणमूल कॉंग्रेस –

जाहीरातीसाठी एकूण खर्च 29.28 लाख रुपये खर्च.

आम आदमी पार्टी –

जाहीरातींवर एकूण 13.62 लाख खर्च केले.

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *