Sat. May 25th, 2019

यंदाच्या निवडणुकीत मनसेचा राजकीय सर्जिकल स्ट्राईक?

0Shares

यंदाच्या लोकसभा निवडणुकांसाठी मनसैनिक तयार झाले असून 9 मार्च पासून  राजकीय सर्जिकल स्ट्राईक होत असल्याचे पोर्स्टस मुंबईत झळकतील.

मनसैनिकांनी या सर्जिकल स्ट्राईकसाठी तयार राहावं, असे या पोर्स्टसमधून सांगितलं आहे.

विशेष म्हणजे 9 मार्च रोजी मनसेचा वर्धापन दिनही साजरा केला जातो. त्यामुळे मनसेचा राजकीय सर्जिकल स्ट्राईक कसा असेल.याबद्धल राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहे. तशी राजकिय पक्षांची तयारी सूरू झाली आहे.

सर्वच पक्षांनी विचारबांधणी सुरू केली असून पक्षातील गटबाजी आणि आघाडीच्या संकल्पना सुरू आहेत.

राज  ठाकरेंची यांची महाआघाडीत एंट्री होईल का?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे  शांत असल्याचं दिसत असले तरी  निवडणुकांची घोषणा होताच, ते महाआघाआडीत सहभागी होतील, अशी चर्चा राजकिय वर्तुळात होत आहे.

वंचित बहुजन आघाडीकडून महाआघाडीत सहभागी होण्याचा कोणताच प्रयत्न सध्या दिसत नाही

म्हणून राज ठाकरे यांच्या मनसेला जवळ करून काँग्रेस राष्ट्रवादी मतांची विभागणी टाळण्याचा प्रयत्न होईल, असं ही म्हणलं जात आहे.

या दरम्यान बहुजन आघाडीकडून महाआघाडीत सहभागी होण्याचा कोणताच प्रयत्न दिसून येत नाही.

म्हणून राज ठाकरेंना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मनसेला महाआघाडीत  स्थान नाही, असं म्हटलं होतं.

पण काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीनी महाआघाडीचे कवाडे सर्वांसाठी  खुलं केलं आहे.

त्यामुळे राज यांची महाआघाडीत एंट्री होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

यामध्येच मनसैनिकांकडून मुंबईतील अनेक भागांत लावण्यात आलेले पोर्स्टस काही वेगळेच संकेत देत आहे.

9 मार्च रोजी राजकीय सर्जिकल स्ट्राईकसाठी तयार राहा, असे या पोर्स्टस वर लिहिले आहे.

राज ठाकरे या वर्धापन दिनी काय भूमिका घेणार, मनसे किती जागा लढणार, की आघाडीत सामील होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या सर्व प्रश्नांची उत्तरे 9 तारखेला मिळतील. त्यामुळे मनसैनिकांचा राजकीय सर्जिकल स्ट्राईक कुणाला तरी भारी पडणार हे आता तेव्हाच कळेल.

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *