Wed. Jul 28th, 2021

पक्ष बदलणे कपडे बदलण्यासारखं; सुप्रिया सुळेंची भाजपा इनकमिंग टीका

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षातील दिग्गज नेते युतीत प्रवेश करत असल्यामुळे विरोधी पक्षांना मोठा धक्का बसत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भाजपा इनकमिंग टीका केली आहे. लोकं कपडे बदलतात तसे पक्ष बदलत असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी हिंगोलीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्ता मेळावा दरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?

हिंगोलीत पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यातील पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांनी पक्ष सोडून जात असलेल्या नेत्यांवर घणाघाती टीका केली आहे.

नवी मुंबईचे सर्वेसर्वा गणेश नाईक यांच्या भाजपा प्रवेशाबाबत सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे.

लोकं कपडे बदलतात तसे पक्ष बदलत असल्याची टीका केली आहे.

राज्यात दुर्देवी राजकारण सुरू असल्याचेही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *