Fri. Jul 30th, 2021

#JNUattack : देशभरात संताप, अमित शहांनी दिले चौकशीचे आदेश

JNU मध्ये अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्याचे पडसाद देशभरात उमटू लागले आहेत. JNU अध्यक्षा (JMUSU) आयेशी घोष तसंच इतर विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर झालेल्या हल्ल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या हल्ल्यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत.

रविवार 5 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास काही अज्ञात गुंडांनी JNU च्या कॅम्पसमध्ये शिरून अध्यक्षा JNSU आयेशी घोषवर जीवघेणा हल्ला केला. या गुंडांनी चेहऱ्यावर कापड गुंडाळलं होतं. त्यामुळे त्यांची ओळख पटली नव्हती. या हल्ल्यात आयेशीबरोबरच इतर विद्यार्थी आणि काही प्राध्यपकही जखमी झाले. यासंदर्भात JNUSU च्या अधिकृत Twitter handleवरून माहिती देण्यात आली.

या प्राणघातक हल्ल्याचे पडसाद मुंबई, हैदराबादमध्येही उमटले आहेत. विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला आहे. अनेक राजकीय नेत्यांनीही या घटनेचा निषेध केलाय.

भाजप खासदार मनोज तिवारी यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

JNUचे विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर झालेला हल्ला पूर्वनियोजित होता, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.

तर JNU मधील हिंसाचार हे देशातील हुशार विद्यार्थ्यांना सरकार घाबरलं असल्याचं प्रतिबिंब असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.

JNU मधील हिंसाचार पोलिसांनी तातडीने थांबवावा. जर विद्यापीठाच्या परिसरात विद्यार्थी सुरक्षित नसतील, तर देश प्रगती कसा करेल?, असा प्रश्न मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *