Sunday, February 16, 2025 11:46:05 AM

Guardian Minister post in Nashik
नाशकात पालकमंत्री पदावरून वाद

जिल्ह्यांचे पालकमंत्री घोषित झाल्यानंतर महायुतीमध्ये वाद सुरु असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यातच आता नाशिक शहरामध्ये पालकमंत्री पदावरून वाद सुरु असल्याचं पाहायला मिळालंय.

नाशकात पालकमंत्री पदावरून वाद

नाशिक: जिल्ह्यांचे पालकमंत्री घोषित झाल्यानंतर महायुतीमध्ये वाद सुरु असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यातच आता नाशिक शहरामध्ये पालकमंत्री पदावरून वाद सुरु असल्याचं पाहायला मिळालंय. नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला स्थागिती मिळाली असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच आता शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी पालकमंत्री पदावरून मोठं विधान केलंय. नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रिपद गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आले होते. सरकारकडून शनिवारी जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नावे जाहीर करण्यात आली होती. मात्र त्यावरून वाद निर्माण झालाय. त्यानंतर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला स्थागिती देण्यात आली. यानंतर आता शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी मोठं विधान केलंय. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

काय म्हणाले अजय बोरस्ते? 

लवकरच नाशिकसाठी गोड बातमी ऐकायला मिळेल. पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे हे लवकर योग्य ते निर्णय घेतील. तसेच नाशिकच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी दादाजी भुसे यांच्याकडे देण्यात येईल असं विधान केलंय. नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रिपद गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आले होते. सरकारकडून शनिवारी जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नावे जाहीर करण्यात आली होती. मात्र त्यावरून वाद निर्माण झालाय.

त्यानंतर शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांनी पालकमंत्रिपदाबाबत मोठं विधान केले आहे. पक्ष नेते एकनाथ शिंदे लवकरच योग्य निर्णय घेतील. त्याचबरोबर नाशिककरांना आनंदाची बातमी मिळेल. नाशिकचे पालकमंत्रिपदाची जबाबदारी दादाजी भुसे यांच्याकडे दिली जाईल असं बोरस्ते हे म्हणालेत.


 


सम्बन्धित सामग्री