Thursday, March 20, 2025 04:09:28 AM

एकनाथ खडसेंची घरवापसी; भाजपात की शरद पवारांच्या पक्षात?

एकनाथ खडसेंची घरवापसी असल्याचं बोललं जातंय. परंतु भाजपात की शरद पवारांच्या पक्षात? हा प्रश्न सर्वानाच पडलाय.

एकनाथ खडसेंची घरवापसी भाजपात की शरद पवारांच्या पक्षात

महाराष्ट्र : एकनाथ खडसेंची घरवापसी असल्याचं बोललं जातंय. परंतु भाजपात की शरद पवारांच्या पक्षात? हा प्रश्न सर्वानाच पडलाय. मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर खडसे पुन्हा चर्चेत आलेत. एकेकाळचे भाजपाचे वरिष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतल्यावर खडसेंच्या भाजपा प्रवेशांची चर्चा सुरू झाली. गेले अनेक दिवस एकनाथ खडसे भाजपात प्रवेश कऱणार अशी चर्चा होती. त्यांनी दिल्लीत जे. पी नड्डा यांची भेटही घेतली होती. मात्र, त्यानंतर त्यांच्या भाजपा प्रवेशाबाबत कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर झाली नाही. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर एकनाथ खडसे यांनी ती भेट राजकीय नसून मतदारसंघातील कामांसाठी असल्याचा खुलासा केलाय. 

हेही वाचा: शाळेत लागली अचानक आग; जवळपास 17 विद्यार्थ्यांचा मृत्यू

भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे शऱद पवारांसोबत फारसे रमले नाहीत. ते भाजपात परत येतील असा दावा भाजपाच्या नेत्यांनीही अनेकदा केला. मात्र त्यांचा भाजपाप्रवेश या ना त्या कारणाने लांबला गेला. गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यावर खडसेंनी भाजपा अध्यक्ष जे. पी नड्डा यांची भेट घेतली.  त्यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे उपस्थित होते. त्यावेळी त्यांचा पक्षप्रवेश होणार होता. पण तो काही कारणानं लांबल्याचं खुद्द खडसे यांनीच सांगितलं होतं. 

त्यावेळी काय म्हणाले खडसे?

भाजपमध्ये प्रवेश करावा,असं माझं मत होतं. भाजप प्रवेशामागं माझी काही कारणं होती. त्याबाबतची चर्चा मी शरद पवार आणि जयंत पाटीलांकडे केली होती. 
माझ्या प्रवेशाला काहींनी विरोध केलेला दिसतोय. अशा परिस्थितीत भाजपत जाणं योग्य नाही. मी लवकरच माझा राजकीय निर्णय घेणार आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

खडसे यांच्या या विधानांनंतर त्यांच्या भाजपा प्रवेशाची शक्यता पूर्णतः मावळली होती. आता राज्यात महायुतीचे सरकार आहे, त्यामुळे एकनाथ खडसे महायुतीच्या नेत्यांशी आणि मुख्यमंत्र्यांशी जुळवून घेत भाजपात परतील अशी एक शक्यता होता मात्र, आता खडसे यांनी स्वतःच प्रवेशाबाबत कोणतीही चर्चा नसल्याचे सांगितल्याने तांत्रिकदृष्ट्या शरद पवार गटात असलेल्या खडसेंची घरवापसी भाजपात होणार की शरद पवार गटात होणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे. 


सम्बन्धित सामग्री