Tuesday, November 11, 2025 09:47:17 PM

Ujjwal Nikam On Phaltan Doctor Case: डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणात उज्ज्वल निकमांची प्रतिक्रिया समोर, हातावर लिहून...

सातारा जिल्ह्यातील फलटण येथील शासकीय वैद्यकीय अधिकारीपदावर कार्यरत असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर राज्यात खळबळ उडाली आहे.

ujjwal nikam on phaltan doctor case डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणात उज्ज्वल निकमांची प्रतिक्रिया समोर हातावर लिहून

मुंबई: सातारा जिल्ह्यातील फलटण येथील शासकीय वैद्यकीय अधिकारीपदावर कार्यरत असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर राज्यात खळबळ उडाली आहे. आत्महत्येआधी त्यांनी सुसाईड नोट हातावर लिहून ठेवली होती. यामध्ये आरोपी पीएसआय गोपाळ बदने आणि पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. एवढंच नव्हे तर पीएसआय गोपाळ बदने याने चार वेळा बलात्कार केला आणि पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर याने मानसिक व शारिरीक छळ केल्याचे त्यांनी सांगितले आहे.     

फलटणमधील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर राज्यातील वातावरण तापले आहे. डॉक्टरने आपल्या तळहातावर नाव लिहत पीएसआय गोपाळ बदने आणि पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप केला. संपदा मुंडेंच्या आत्महत्येनंतर काही तासात पोलिसांनी पोलीस कर्मचारी प्रशांत बनकरला अटक केली. बनकरला त्याच्या राहत्या घरातूनही पोलिसांनी अटक केली. आरोपी पीएसआय काही तास फरार होता, शेवटी रात्री उशिरा तो पोलिसांना शरण आला.

हेही वाचा: Rahul Gandhi On Phaltan Doctor Case : भाजप सरकारचा अमानवीय आणि असंवेदनशील चेहरा समोर, सातारा डॉक्टर प्रकरणी राहुल गांधींचा निशाणा

संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणावर राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम यांनी भाष्य केले आहे. उज्ज्वल निकम म्हणाले, "खरोखरच एखाद्या महिला वैद्यकीय अधिकारीला अशाप्रकारे हातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या करावी लागते तर हे दुर्दैवी आहे. या प्रकरणात सखोल चाैकशी व्हायला हवी. स्वत: तिने हातावर लिहून आत्महत्या करणे म्हणजे नक्कीच धक्कादायक आहे. फलटणच्या घटनेबाबत पोलीस तपास सुरू झाला आहे."

पुढे बोलताना, मुख्यमंत्र्यांनी या घटनेची तात्काळ दखल घेऊन संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित देखील केल आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे. सातारा पोलीस लवकरच सखोल चौकशी करतील आणि आरोपींविरुद्ध आरोप पत्र दाखल करतील, असेही उज्ज्वल निकम यांनी म्हटले. 


सम्बन्धित सामग्री