मुंबई : देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री झाल्यानंतर बुधवारी आणि आज पहिलाच दिल्ली दौरा आहे. फडणवीसांनी एकूण सात नेत्यांच्या भेटी दिल्या. 5 निरनिराळ्या मूर्ती देऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविले आहे. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींना त्यांनी विठ्ठल- रुक्मिणीची मूर्ती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांनी छत्रपती शिवरायांची मूर्ती दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फडणवीसांनी वीर सावरकरांची मूर्ती दिली आहे. भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना त्यांनी गाय-वासरुची मूर्ती दिली आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग आणि नितीन गडकरींना फडणवीसांनी सिद्धीविनायकाची मूर्ती दिली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सात नेत्यांना पाच वेगवेगळ्या मूर्ती देऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवले आहे. राष्ट्रीय नेतृत्वांना महाराष्ट्रातील देवतांच्या मूर्ती देऊन महाराष्ट्राचा वारसा जपण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे.