Friday, March 06, 2026 01:57:47 PM

Tanaji Sawant Audio Clip : "कोटी, दोन कोटी, काय लागतील ते जाऊ दे", सावंतांच्या व्हायरल क्लिपने उडवली खळबळ

12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी काल, 7 फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडली. अशातच शिवसेना एकनाथ शिंदे गटातील नेते तानाजी सावंतांबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

tanaji sawant audio clip  quotकोटी दोन कोटी काय लागतील ते जाऊ देquot सावंतांच्या व्हायरल क्लिपने उडवली खळबळ

महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी काल, शनिवारी 7 फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. अशातच शिवसेना एकनाथ शिंदे गटातील नेते तानाजी सावंत यांच्या संदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

हेही वाचा- 8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 'आनंदाची बातमी'; आठव्या वेतन आयोगाची प्रश्नावली प्रसिद्ध; 'या' प्रश्नांची उत्तरे द्या आणि पगारवाढ मिळवा?

तानाजी सावंत यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. मतदानाच्या दिवशी पैसै वाटपाबाबत त्यांची कथित ऑडिओ क्लिप असल्याचं म्हटलं जात आहे. कोटी, दोन कोटी, काय लागतील ते जाऊ द्या असं म्हटल्याची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. एवढचं नव्हे तर मतदारांना प्रत्येकी दोन हजार रुपये दिल्याचा संवाद देखील या ऑडिओ क्लिपमधून समोर आला आहे. कार्यकर्त्याला सूचना देतानाच्या त्याच्या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यावर तानाजी सावंत यांच्या कार्यकर्त्यांनी हा ऑडिओ क्लिप बनावट असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान जय महाराष्ट्र या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. 
 


सम्बन्धित सामग्री