Saturday, January 25, 2025 08:56:44 AM

Devendra Fadanvis
मराठी माणसाचे मुंबईत राहण्याचे स्वप्न पूर्ण होणार...

मुंबईमध्ये रहिवाशी ही सर्वात मोठी समस्या आहे.

मराठी माणसाचे मुंबईत राहण्याचे स्वप्न पूर्ण होणार

मुंबई : मुंबईमध्ये रहिवाशी ही सर्वात मोठी समस्या आहे. बीडीड चाळ किंवा अभूद्यनगर सारख्या योजना किंवा महाडाचा आराखडा यासाठी खूप मोठ काम सुरू केलं. मराठी माणसाला मुंबईत घर मिळालं पाहिजे. हा मुंबईकरांसाठी प्रयत्न केला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

सेल्फ रिडेव्हलपमेंट सुरू केली म्हणजेच बिल्डरांच्या घशात न जाता सहकारी बँकांनी स्वत:च रिडेव्हलपमेंट करावं. त्याकरिता आपण त्यांच्या 17 मागण्या मान्य केल्या. मुंबई बँकेच्या माध्यमातून प्रवीण दरेकरांनी कर्ज देण्यास सुरू वात केली. 16 इमारती तयार झाल्या आहेत. 1 हजार 400 प्रपोजल आली आहेत. त्यामुळे मोठ्या रहिवाशी समस्या सुटणार आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुंबईत शहरात लोकांची संख्या वाढत आहे. त्या सगळ्या लोकांना मुंबईत स्वत: घर घेणं शक्य नाही. त्या लोकांना मुंबईत घरं देण्याचं काम सरकार करत आहे. आतापर्यंत 16 इमारती सरकारने तयार केल्या आहेत. 1 हजार 400 प्रपोजल आली आहेत. त्यावर काम सुरू आहे. महायुती सरकार नागरिकांचे मुंबईत राहण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम करत आहे.    

 


सम्बन्धित सामग्री