पुणे : छत्रपती संभाजी यांच्या स्वराज्य संघटनेला पक्ष म्हणून निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाने भारतीय निवडणूक आयोगाकडे नोंदणी केली आहे. त्यांना निवडणूक चिन्ह देखील मिळाले. निवडणूक आयोगाने सप्तकिरणांसह पेनाची निब हे निवडणूक चिन्ह दिले आहे. आजपासून स्वराज्य संघटनेचे रूपांतर अधिकृतपणे एका राजकीय पक्षात झालेले आहे.