१३ ऑगस्ट, २०२४, मुंबई : जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष मुलाखत संपादक प्रसाद काथे यांनी घेतली. यामध्ये, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार काय बोलले वाचूया... ''राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, बहिणी माझ्या सगळ्या लाडक्या आहेत. अनेक घरांमध्ये राजकारण त्याठिकाणी चालत. राजकारण हे फार घरात शिरू द्यायचं नसत. माझ्याकडून थोडीशी चूक झाली. त्याकाळामध्ये मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होत. त्यावेळेस केलं गेलं. पार्लमेंटरी बोर्डानी निर्णय घेतला गेला. परंतु आता जे झालं ते बाण सुटल्यावर आपण काही करू शकत नाही. पण आज माझं मन मला सांगत तस व्हायला नको होत. दौरा महाराष्ट्राचा सुरू आहे. या दौऱ्यादरम्यान मी तिथं असलो आणि माझ्या बहिणीं तिथं असतील तर मी जाईल.'' अशी आश्चर्यकारक कबुली जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला अजित पवार यांनी दिली.