अहिल्यानगर : काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी निवडणूक आयोग आणि ईव्हीएमवर भाषणातून संशय व्यक्त केला होता. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्या विषयी बोलताना संशोधन करण्याचा विषय आहे असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले होते यावर भाजपाने या वक्तव्याचा समाचार घेतला होता. आता यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पलटवार केला आहे; 'जो माणूस दुपारी बारा वाजता घराच्या बाहेर निघत असेल, त्याच्याकडून माणसं निवडून येऊच शकत नाही'
राज ठाकरे यांच्या राजकीय बिंबावर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जोरदार हल्ला चढवला आहे. मंगळवारी झालेल्या राज ठाकरे यांच्या मेळाव्यात, त्यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 42 आमदारांवर संशय व्यक्त केला होता. राज ठाकरे यांच्या आरोपावर अहिल्यानगर राष्ट्रवादी पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी जोरदार हल्ला चढवत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
👉👉 हे देखील वाचा : "शरद पवारांना 10 जागा, अजित पवारांना 42? संशोधनाचा विषय!" - राज ठाकरे
राज ठाकरे यांनी आपल्या मेळाव्यात या संदर्भात बोलताना अजित पवार यांच्या पक्षाच्या निवडणुकीच्या निकालावर प्रश्न उपस्थित केला आणि यावर शंका व्यक्त केली की, राष्ट्रवादी कशाप्रकारे आणि कशांच्या मदतीने विधानसभा निवडणुकीत इतकी मोठी संख्या जिंकून आली.
पण या आरोपानंतर, संग्राम जगताप यांनी खुलासा केला आणि म्हटलं की, 'अजित पवार हे पहाटे सहा वाजता घराबाहेर नागरिकांमध्ये असतात आणि त्यांच्या कष्टामुळेच त्यांना इतकी यशस्वी निवडणूक लढत आली आहे. त्यांनी पक्षाचे नेतृत्व करून इतरांप्रमाणेच कष्ट करूनच आमदार निवडून आणले.'
👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
संग्राम जगताप यांनी म्हटलं की, 'जो माणूस दुपारी बारा वाजता आणि एक वाजता घरा बाहेर पडत असेल, त्याच्याकडून माणसं निवडून आणूच शकत नाही. त्यांचं काम आणि त्यांची कर्तृत्व सिद्ध झाली आहेत.' त्यासोबतच, त्यांनी राज ठाकरेंना टोला मारला आणि सांगितलं की, 'ज्याच्या मनात नैराश्य असतो, तोच अशा प्रकारचे वक्तव्य करतो.'
राज ठाकरेंचे या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एक महत्त्वाची चर्चा झाली आहे. यावर अजित पवार आणि त्यांच्या गटाने त्यांचं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या प्रकरणामुळे राज्यातील राजकारणात चांगला गोंधळ होण्याची शक्यता आहे.